1प्रवाशांचे आराधना गीत. याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;
2माझा धावा ऐका; प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे तुमचे कान लागोत.
3याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?
4पण तुम्ही क्षमाशील आहात; म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो.
5मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
6पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
7हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.
8ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.