1प्रवाशांचे आराधना गीत. जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
2आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
3याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
4हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या.
5जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.
6जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.