1याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2“मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे?
3काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय?
4आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात?
5ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?
6“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्या लोकांशी मी वागेन.
7मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
8ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”